Arun Jakhade : ज्येष्ठ संपादक, मराठी ग्रंथप्रकाशक, लेखक अरुण जाखडे यांचं निधन

मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक अरुण जाखडे यांचं निधन झालंय. ज्येष्ठ संपादक अरुण जाखडे यांनी पद्मगंधा प्रकाशन  सुरु करुन अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली. त्यांनी मराठी प्रकाशक परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं. याशिवाय त्यांना विविध साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. पद्मगंधा प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून  त्यांनी  जगभरातील तत्त्वज्ञान, आणि ललित कथांचे मराठी भाषेतील अनुवाद देखील प्रकाशित केले आहेत. यामध्ये ‘अगाथा खिस्ती यांची हर्क्यूल पायरट मालिका’, पाउलो कोएल्हो यांची ‘द अलकेमिस्ट’ आणि ‘द जहीर’ ही पुस्तके, टोनी मॉरिसन यांचे ‘बिलव्हड’ हे पुस्तक, जीन पॉल सार्ट्रे यांचे ‘ली मॉट्स’ आणि सिमोन दी ब्यूवॉयर यांचे ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकांचा समावेश आहे. याबरोबरच महाराष्ट्रातील लोकसाहित्य, लावणीचा शैक्षणिक अभ्यास आणि साहित्यिक समीक्षा यांच्यावरील 40 हून अधिक पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola