WEB EXCLUSIVE | खाकीतली सौंदर्यवती, PSI पल्लवी जाधव 'ग्लॅमऑन मिस इंडिया' स्पर्धेत फर्स्ट रनर अप
जालना दामिनी पोलीस पथकातील प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव या 'ग्लोमन मिस इंडिया' स्पर्धेत फस्ट रनर अप ठरल्या. याशिवाय 'मिस फोटोजेनिक' हा किताबही त्यांनाच मिळाला. जयपूरमध्ये आयोजित या स्पर्धेत देशभरातून 70 पेक्षा अधिक महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. यात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या पीएसआय पल्लवी जाधव यांना फस्ट रनर अप घोषित करण्यात आलं. पीएसआय पल्लवी जाधव गेल्या पाच वर्षांपासून जालना पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.