Suicide Attempt : विधानभवनाबाहेर आत्मदहनाच्या प्रयत्नात आंदोलक जखमी ABP Majha
विधानभवनात अधिवेशन सुरु असताना विधानभवनाच्या बाहेर उस्मानाबादमधील एका व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. आत्मदहनाचा प्रयत्न करणारे सुभाष देशमुख गंभीर जखमी झालेत. उस्मानाबादच्या तांदुळवाडीच्या सुभाष देशमुख यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि ज्वलनशील पदार्थही ताब्यात घेतलाय. त्यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Tags :
Vidhan Bhavan Osmanabad Subhash Deshmukh GT Hospital Convention Outside Vidhan Bhavan Attempted Self-immolation Critically Injured Tandulwadi