ST Worker Strike : ST कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी 28 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आंदोलन
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी २८ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा एसटी सेवेवर परिणाम होणार नाही. एसटी कर्मचारी या आंदोलनात अन्नत्याग करुन बससेवा सुरु ठेवणार आहेत. सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाकडून या अभिनव आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी आहेत. राज्य सरकारवर विश्वास ठेवून आपण चूक केली, अशी भूमिका सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या वतीनं मांडण्यात आली.
Tags :
Protest Azad Maidan MLA Gopichand Padalkar Bus Service Various Demands State Transport Board On Behalf Of Employees 28 February Impact On ST Service Food Sacrifice Sevashakti Sangharsh ST Employees