नजरचुकीने निर्णय की निवडणुकीवर नजर? बचत योजनांवरील निर्णयावरून प्रियांका गांधी यांचा अर्थमंत्र्यांना सवाल
Continues below advertisement
नवी दिल्ली : छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. रात्री उशीरा माहिती समोर आली होती की, आर्थिक वर्ष 2020-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले आहे. पण आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. तो आदेश नजर चुकीने निघाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
Continues below advertisement