Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत खासगी, सरकारी वाहतूक बंद, 9 जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन
Continues below advertisement
रत्नागिरी : जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आहे. 2 जूनच्या मध्यरात्रीपासून अर्थात 3 जूनपासून सुरू होणार हा लॉकडाऊन 9 जूनपर्यंत असणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, यापूर्वी 2 जून ते 8 जून अशी लॉकडाऊनची तारीख होती. पण, लोकांना वेळ मिळावा, कुठंही गोंधळ होऊ नये या दृष्टीनं 3 ते 9 जूनच्या कालावधीत जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यावेळी जिल्हावासियांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement