Saffron Terror Row | Prithviraj Chavan यांना Sanatan संस्थेची 10 कोटींची नोटीस

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सनातन संस्थेकडून दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. सनातन संस्थेला 'दहशतवादी' संबोधल्यामुळे ही नोटीस देण्यात आली. 'बिनशर्त माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा,' असा इशारा नोटिशीतून देण्यात आला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी 'भगवा' शब्द आतंकवादासाठी वापरू नये, असे आवाहन केले होते. 'भगवा हा महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेसाठी पवित्र शब्द आहे. हा शिवछत्रपतींच्या ध्वजाचा रंग आहे, तो आतंकवादाला जोडू नका,' असे त्यांनी म्हटले. 'तुम्हाला म्हणायचे असेल तर सनातनी आतंकवाद म्हणा, हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा, पण रंग देऊ नका,' असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चंपावती क्रीडा मंडळाचा आढावा घेतला. परिसरातील कचरा हटवून पार्किंग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 'माझ्याकडे काही जादूची कांडी नाही. तुम्ही सहकार्य केले तर इथे विकास होईल. जर सहकार्य केले नाही तर मी जातो,' असे म्हणत त्यांनी बीडकरांना संयमाचा सल्ला दिला आणि नाराजी व्यक्त केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola