Prithviraj Chavan : लोकसभेच्या निकालानंतर लाडकी बहीण आठवली

Continues below advertisement

Prithviraj Chavan : लोकसभेच्या निकालानंतर लाडकी बहीण आठवली 

दहा वर्ष त्यांना लाडकी बहिण आठवली नाही.लोकसभेच्या निकालाच्या नंतर त्यांना लाडकी बहीण आठवली...माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचे पुढील हफ्ते पाहिजे असतील तर आम्हला मतदान करा अस म्हटल आहे.यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की आत्ता त्यांना त्याशिवाय काहीही दिसत नाही.दहा वर्ष त्यांना लाडकी बहिण आठवली नाही.लोकसभेच्या निकालाच्या नंतर त्यांना लाडकी बहीण आठवली ही चांगली गोष्ट आहे. ही योजना आम्ही कर्नाटक मध्ये यशस्वीरीत्या राबवली आहे.तसेच तेलंगणा येथे देखील ही योजना आम्ही राबविली आहे.आम्ही काय करायचं आहे हे आमच्या जाहीरनाम्यात कळेल अस यावेळी चव्हाण यांनी सांगितल.

रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण लिखित 'हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे?' पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जागावाटपाच्या बाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले की याबाबत जाहीर रित्या सांगता येणार नाहीये. काल पासून जागावाटपाच्या बाबत चर्चेला सुरवात झाली आहे. बंद दाराच्या आत जागावाटपाच्या बाबत चर्चा होत आहे.आम्ही आमचं आकलन करत आहोत.जेव्हा आमचं ठरेल तेव्हा आम्ही नक्कीच याबाबत सांगू अस यावेळी चव्हाण म्हणाले.

मुख्यमंत्री पदाच्या चेहेऱ्या बाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारल असता ते म्हणाले की महाराष्ट्राची परंपरा आहे की एखादा मुख्यमंत्री जर निवडणुकीला सामोरे जात असेल तर त्याचा चेहरा हा आपोआप मुख्यमंत्री म्हणून पुढे केला जातो. विरोधक म्हणून जेव्हा निवडणुकीला सामोरे जातो आणि बहुमत मिळतो आणि ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतात त्या पक्षाचं मुख्यमंत्री हा होत असतो.ही साधारणतः पद्धत असते आता आम्ही विरोधात निवडणूक लढवत असल्याने आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहेरा ठरवणे योग्य नाही.अस यावेळी चव्हाण म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram