Ranji Trophy: पृथ्वी शॉचा विक्रमी धमाका, रणजी इतिहासातलं दुसरं सर्वात वेगवान द्विशतक!
Continues below advertisement
महाराष्ट्राचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने चंदीगडविरुद्धच्या (Chandigarh) रणजी सामन्यात (Ranji Match) विक्रमी द्विशतक झळकावले आहे. पृथ्वीने आपलं द्विशतक केवळ १४१ चेंडूत पूर्ण केलं, जे रणजी करंडकाच्या (Ranji Trophy) इतिहासातलं दुसरं वेगवान द्विशतक ठरलं आहे. मुंबईकडून महाराष्ट्रात खेळायला आलेल्या पृथ्वीने अवघ्या १५६ चेंडूत नाबाद २२२ धावांची स्फोटक खेळी साकारली, ज्यात २९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर महाराष्ट्रानं आपला दुसरा डाव ३ बाद ३५९ धावांवर घोषित केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चंदीगडने प्रत्युत्तरात १ बाद १२९ धावा केल्या होत्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement