Prime Minister of the United Kingdom :ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागणार?

Continues below advertisement

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोविड काळात पंतप्रधान कार्यालयात केलेल्या पार्टीमुळेे पद सोडण्याची वेळ येईल अशी चिन्हं आहेत. मे २०२० मध्ये लॉकडाऊन काळात जॉन्सन यांच्या कार्यालयात पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यात जॉन्सनही सहभागी झाले होते. त्याची कबुली जॉन्सन यांनी दिल्यानंतर त्यांच्यावर केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर त्यांच्या पक्षातूनही राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. ब्रिटनमधील आघाडीची सट्टेबाज कंपनी बेटफेअरने हा दावा केलाय. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये पंतप्रधानांवर अशी वेळ येऊ शकते, तर आपल्या देशात नियमावलीचं सर्रास उल्लंघन करणाऱ्या आपल्या नेत्यांवर अशी कारवाई होऊ शकते का? असा सवाल या निमित्तानं व्यक्त होतोय. आपल्याकडे देशभरात गेल्या दोन वर्षांत नेत्यांनी कोविड नियमावलीचं उल्लंघन केल्याच्या अनेक घटना समोर आल्या. राजकीय नेत्यांच्या मुलांच्या लग्नापासून ते राजकीय कार्यक्रमापर्यंत सर्वत्र नियम धाब्यावर बसवले जातात. पण गुन्हा नोंद होण्यापलिकडे फारशी कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. असं असताना ब्रिटनमध्ये मात्र पंतप्रधानांना पद सोडायची वेळ येण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram