PM Modi Meeting: पंतप्रधान मोदींचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद, देशातील कोरोना स्थितीचा आढावा
देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा आज चर्चा करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी होणार आहेत. आजारपणानंतर पहिल्या मोठ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होत असल्याने त्यांच्या सहभागाबद्दल उत्सुकता लागली आहे.