ABP News

Ekvira Devi Temple | खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाच्या तयारीला वेग

Continues below advertisement

महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त तयारीला वेग आला असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारने मंदिरे उघडण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. एकवीरा देवी मंदिरात घटस्थापनेपासून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून मंदिर परिसरात व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. नवरात्र उत्सव बाबत मंदिर प्रशासनाला अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही आदेश प्राप्त झालेले नसले तरी प्रशासनाच्या नियमानुसारच नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाईल भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या नवरात्र उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram