Parbhani Flood : गर्भवती महिलेचा तराफ्यातून जीवघेणा प्रवास, रुग्णालयात पोहोचताच गोंडस मुलाला जन्म
Continues below advertisement
परभणीत दुधना नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. यावेळी एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी दोन भावांनी थर्माकॉलचा तराफा बनवला. गर्भवती रुग्णालयात अतिशय भयावह परिस्थितीतून पुराच्या पाण्यातून गेली. रुग्णालयात पोहोचताच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
Continues below advertisement