Sangli: सामाजिक शांततेसाठी भोंग्याविना नमाज पठण ABP Majha
सांगलीच्या मिरजमध्ये बहुतांश मशिदींमध्ये भोंग्याविना पहाटेची अजान पार पडली. भोंग्यावर नमाज पठण झाल्यास हनुमान चालिसा पठणाचा इशारा मनसेनं दिला होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम समाजाने भोंग्यांविना नमाज पठण केलं. सामाजिक शांततेसाठी पहाटेची अजान भोंग्यांविना करण्यात आल्याचं मुस्लिम समाजाकडून सांगण्यात आलं.