Pravin Tarde on Shiv Jayanti 2024 : कशी होती शिवरायांच्या संकल्पनेतील शेती पद्धत?
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPravin Tarde on Shiv Jayanti 2024 : कशी होती शिवरायांच्या संकल्पनेतील शेती पद्धत?
शिवरायांचे आठवावे रुप... शिवरायांचा आठवावा प्रताप... छत्रपती शिवरायांच्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण आठवाव्यात, त्या अभ्यासाव्यात आणि आपल्या आचरणातही आणाव्यात. शिवरायांच्या अशाच काही पैलूंचं दर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत आमच्या अष्टपैलू शिवराय या खास कार्यक्रमातून. छत्रपती शिवराय केवळ युद्ध किंवा राज्यकारभारापुरते मर्यादित नव्हते. राज्यातला प्रत्येक घटक त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा होता. शेतीक्षेत्रासाठी त्यांनी दिलेलं योगदान तेवढंच महत्वाचं आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे सांगतोय त्यांच्या याच पैलूबद्दल.