
Pravin Datke on Nagpur Clash : नागपुरात राडा, पोलिसांवर गंभीर आरोप; भाजप आमदार प्रविण दटके EXCLUSIVE
Pravin Datke on Nagpur Clash : नागपुरात राडा, पोलिसांवर गंभीर आरोप; भाजप आमदार प्रविण दटके EXCLUSIVE
ठरवून केलेला हा प्रकार आहे.. इथे दोन्ही समाजाच्या गाड्या असतात.. काल इथे फक्त एका समाजाच्या गाड्या होत्या.. नागपूर पोलिसांनी ज्या भागात तणाव असतो.. तिथे पहिल्यांदा पोलिस नव्हते.. घटना घडल्यानंतर पोलिस पोहोचले.. नागरिकांनी फोन करुनही पोलिस पोहोचले नाहीत तीन- तीन डीसीपी जखमी आहेत.. हे नागपुरात पहिल्यांदा झालं संवेदनशील ठिकाणी पोलिस योग्य वेळी आले नाहीत हा स्थानिकांचा आरोप आहे सीसीटीव्ही तोडून तोडफो़ड.. पीआय संजय सिंग यांना निलंबित करा आमची मागणी आहे
हे ही वाचा..
औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नागपूरमध्ये हिंसक पडसाद उमटले होते. सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये (Nagpur News) दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. नागपूरच्या महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क परिसरातही याची झळ पोहोचली. 'एबीपी माझा'ने येथील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी भयावह अनुभव सांगितला. चिटणीस पार्कमधील पेशने कुटुंबीयांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांची गाडी जाळण्यात आली. पेशने कुटुंबातील गृहिणीने सांगितले की, काल संध्याकाळी सात-आठच्या दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी अचानक जमावाने लोखंडी रॉड आणि दगडांच्या सहाय्याने आमच्या भागात हल्ला चढवला.