Pravin Darekar on Yogesh Kadam : लोक प्रतिनिधींचे अपघात वाढले आहेत, चौकशी करायला हरकत नाही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMLA Yogesh Kadam Accident : शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातात योगेश कदम यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत. पोलादपूरच्या कशेडी घाटात टँकरने मागून धडक दिल्यानं अपघात झाला. दरम्यान माझ्या गाडीला झालेला अपघात घातपाताची शक्यता असू शकते, असा संशय आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाशी बोलताना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम म्हणाले की, "काल रात्री माझ्या गाडीचा अपघात झाला. परंतु, आई जगदंबेच्या कृपेनं या अपघातातून मी सुखरूप बचावलो. माझ्या गाडीच्या पाठी माझी एस्कॉर्ट गाडी होती आणि पुढे रायगड पोलिसांची गाडी होती. तरीही, पाठून एक डंपर वेगानं आला आणि पाठच्या पोलिसांच्या गाडीला धडकला. त्यानंतर माझ्या गाडीलासुद्धा जोरदार धडक बसली आणि अपघात झाला. पण मी सीटबेल्ट घातला होता. त्यामुळे मला काहीही दुखापत झाली नाही."