Vegetable : केंद्राला जबाबदार धरणार का? भाज्यांच्या दरांवरून प्रविण दरेकरांचा ठाकरे सरकारला चिमटा
Continues below advertisement
पेट्रोल, डिझेलच्या दरानं शंभरी पार केल्यानंतर आता भाज्यांचे दरही त्यांच्याशी स्पर्धा करू लागलेत. बाजारात कोथिंबीरीच्या जुडीनंही शतक गाठत डिझेलशी बरोबरी केली आहे. कोथिंबीरीला टोमॅटोची स्पर्धा आहे. टोमॅटो सध्या 80 ते 100 रुपये किलोनं विकला जातोय. तर कांद्याचा दरही 60 ते 80 रुपये किलो आहे. या दरवाढीवर आता विराधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे आणि राज्यात शेतकऱ्यांचे हाल सरू आहेत असं देखील म्हटलं आहे.
Continues below advertisement