Pravin Darekar : रामाचं दर्शन कोणीही घेऊ शकतो, टोकाची भूमिका घेऊ नये, प्रवीण दरेकरांचं आवाहन
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुढील महिन्यात 5 जून रोजी अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी कडाडून विरोध केला आहे. उत्तर भारतीयांना मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी, मगच अयोध्येत पाय ठेवावा, असा इशारा ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी दिला आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध दर्शवण्यासाठी स्वत:च्या मतदारसंघात साधू संत आणि समर्थकांचा मेळावा आयोजित केला. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना यूपीत पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार ब्रिजभूषण सिंह समर्थकांनी केला आहे.
Continues below advertisement