Election : प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांचा हितेंद्र ठाकूरांसाठी विरारला लोकलने प्रवास
abp majha web team
Updated at:
18 Jun 2022 10:44 PM (IST)
Election : बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी भेट घेतलीयय महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडीची अडचण होऊ नये म्हणून दोन्ही नेते विरारसाठी लोकलने प्रवास केलाय.. विधानपरिषद निवडणुकीसाठी एक एक मत मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे... राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने त्यांचे उमेदवार धनंजय महाडिक यांना जिंकवून आणत चमत्कार घडवून आणला होता. आतादेखील भाजप असाच चमत्कार घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. याच मतासाठी भाजप नेत्यांनी आज बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.