Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar : वडेट्टीवार - धानोरकर वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठक

Continues below advertisement

चंद्रपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा पुन्हा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे. प्रतिभा धानोरकर यांनी रविवारी थेट विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात जाऊन अल्पसंख्यकांची सत्ता संपवा आणि पक्ष न पाहता कुणबी उमेदवार निवडून आणा असं आवाहन केलंय. त्या माध्यमातून धानोरकरांनी अप्रत्यक्षपणे विजय वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं आवाहन केलंय.

ब्रम्हपुरीतून अल्पसंख्यकांची सत्ता संपवा, पक्ष न पाहता फक्त कुणबी उमेदवार निवडून आणा असं आवाहन केलंय चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी. धानोरकर यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा इशारा होता त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे. वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी मतदारसंघात जवळपास 60 हजार कुणबी मतदार आहेत आणि हीच बाब लक्षात घेऊन धानोरकर यांनी वडेट्टीवारांना पराभूत करण्याचा ब्रम्हपुरी शहरात झालेल्या कुणबी महाअधिवेशनात अप्रत्यक्ष इशारा दिला.

वडेट्टीवारांच्या विरोधात भाजप कुणबी उमेदवार देणार

वडेट्टीवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत भाजप कुणबी समाजाचा उमेदवार देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आमदार परिणय फुके यांनी तर जाहीरपणे आपण देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे कुणबी उमेदवार देण्याची मागणी करणार असल्याचं वक्तव्य देखील केलं. विशेष म्हणजे फुके यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून धानोरकर यांनी यावेळी पक्ष न पाहता कुणबी उमेदवाराला जिंकून देण्याचं जाहीर आवाहन केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram