Prathamesh Sawant Death : दहिहंडी खेळताना गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या तरुणाचं निधन

Prathamesh Sawant Death :  दहिहंडी खेळताना थरावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या तरुणाचं आज मुंबईतील केईएम रुग्णालयात निधन झालंय. प्रथमेशवर मागील महिनाभरापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला न्युमोनिया झाला. त्याच दरम्यान आज सकाळी प्रथमेशचं हृहयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. प्रथमेश सावंतचे वय २० वर्ष होतं. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. यंदाच्या गोविंदा उत्सवात मुंबईत दोन तरुणांनी आपला जीव गमावलाय. याआधी थरावरून कोसळलेल्या संदेश दळवी या तरुणाचं उपचारादरम्यान निधन झालं होतं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola