Prashna Maharashtrache | शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तुटलेली नाही: संजय राऊत

"मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे. मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जात आहे. मुंबईतील प्रमुख संस्था बाहेरच्या राज्यात नेल्या जात आहेत. शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे," असं शिवसेना खासदार संजय राऊत राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर म्हणाले. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, "शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तुटलेली नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील प्रमुख संस्था बाहेर नेल्या जात आहेत. मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे.मुंबईची आर्थिक ताकद कमी करुन मुंबई पंख छाटले जात आहेत."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola