2024 मध्ये मोदींना पराभूत करणारी आघाडी उभी करणं शक्य, राजकीय रणनीतीकार Prashant Kishor यांना विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय नाही, अशी चर्चा नेहमीच केली जाते. पण 2024 मध्ये भाजपला पराभूत करण्याचा प्लॅन अनेक निवडणुकांत महत्त्वाची भूमिका बजावलेले चाणक्य प्रशांत किशोर यांनी बोलून दाखवलाय. 2024 मध्ये भाजपला पराभूत केलं जाऊ शकतं, असा विश्वास निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलाय. भाजपला पराभूत करू शकणारी आघाडी उभी करणं शक्य आहे. इतकंच नाही, तर त्या आघाडीला मदत करायची आपली इच्छा असल्याचंही किशोर यांनी म्हटलंय.