Prasad Lad : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची नवाब मलिकांवर टीका
माझ्यावर पाळत ठेवली जातेय आणि माझा अनिल देशमुख केला जाईल असं सांगणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदमध्ये म्हटले होते. त्यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी नबाव मलिक यांचे डोकं फिरलंय अशी टीका केली आहे. नवाब मलिक यांना हायकोर्टानं समीर वानखेडे आणि त्यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांच्या विरोधात बोलण्यास बंदी घातलीय. सातत्याने मिडियात रहायचे आणि मंत्री म्हणुन काही काम करायचं नाही त्यामुळे नबाव मलिक असे बोलत असल्याचं लाड यांनी रत्नागिरी येथील पत्रकार परिषदमध्ये म्हटले आहे.