Prasad Lad on Manoj Jarange : मनोज जरांगेंना 'देवेंद्र द्वेष' नावाचा आजार झालाय
Continues below advertisement
मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय, आमदार प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका, जरांगेंनी चर्चेला यावं, मराठा समाजासाठी कोणी काय केलं यावर चर्चा करू, आमदार प्रसाद लाड यांचं आवाहन.
जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद (Prasad Lad) लाड यांच्यावर जरांगे यांनी शेलक्या शब्दात टीका केली. माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायलं लाऊ नको, तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेत असं मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत, आता मराठे आमदार आणि मंत्री मराठ्यांच्याच अंगावर घालत मजा पाहत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
Continues below advertisement