ABP News

Praniti Shinde Lok Sabha Oath : हातात संविधान घेत प्रणिती शिंदे यांनी घेतली शपथ

Continues below advertisement

Praniti Shinde Lok Sabha Oath : हातात संविधान घेत प्रणिती शिंदे यांनी घेतली शपथ  'या' नवीन खासदारांनी घेतली शपथ चंद्रपूर लोकसभेच्या खसादर प्रतिभा धानोरकर, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी देखील शपथ घेतली. तसेच परभणीचे खासदार संजय जाधव, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण, जालन्याचे खसदार कल्याण काळे,, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, हेमंत सावरा, निलेश लंके, सुरेश म्हात्रे, सुनिल तटकरे, श्रीरंग बारणे या नवीन खासदारांनी देखील आज शपथ घेतली. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज लोकसभेत निवडूण आलेल्या सर्व सदस्यांचा शपथविधी पार पाडला. यावेळी महाराष्ट्रातील खासदारांनी शपथ घेतली.  आष्टीकर शपथ घेत असताना, अध्यक्षांनी त्यांना थांबवलं आष्टीकर यांनी अशी शपथ घेत असताना, अध्यक्षांनी त्यांना थांबवलं आणि जे लिहिलं आहे तेच वाचायला सांगितलं. असं चालणार नाही, जे मराठीत लिहिलं आहे तेच वाचावं लागेल, तशीच शपथ घ्यावी लागेल, असं सांगितलं. त्यानंतर मग नागेश पाटील आष्टीकर  यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. यावेळी त्यांनी अन्य नावांचा उल्लेख टाळत जशी लिहिली आहे तशीच शपथ घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरु होता. यामध्ये  ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाच्या बाबूराव कदम यांचा पराभव केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram