Praniti Shinde : भाजप, मराठा कार्यकर्त्यांचा प्रणिती शिंदेंवर आरोप

Continues below advertisement

Praniti Shinde :  भाजप, मराठा कार्यकर्त्यांचा प्रणिती शिंदेंवर आरोप  काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांना गुरुवारी पंढरपूर येथे कथित मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. सरकोली गावाजवळ कथित मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदे यांची गाडी घेरली. त्यांना गावात शिरण्यापासून मज्जाव केला. बराचवेळ उलटून आंदोलकांचा घोळका प्रणिती शिंदे यांच्या गाडीची वाट सोडायला तयार नव्हता. यादरम्यान काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हाताने जोरात फटके मारत गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या संतापाचा पारा चढला आणि त्या थेट गाडीतून उतरुन जमावाला सामोऱ्या गेल्या. दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram