Nashik Garden : प्रमोद महाजन उद्यानाची तोडफोड, लोकार्पणानंतर २ दिवसांतच कुलूप! Special Report

Continues below advertisement
नाशिकच्या (Nashik) गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाचे (Pramod Mahajan Garden) नूतनीकरण करून गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) आणि आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांच्या हस्ते लोकार्पण झाले, पण दोनच दिवसांत नागरिकांच्या तोडफोडीमुळे ते बंद करण्याची नामुष्की ओढवली. 'हा काही नागरिकांकडून मुद्दाम केलेला खोडसाळपणा आहे,' असे म्हणत महापालिकेने कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. लोकार्पणानंतर झालेल्या गर्दीमुळे उद्यानातील छोटा भीम आणि वाघाच्या मूर्तीसह अनेक खेळण्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण असून, करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. महापालिका आता सीसीटीव्ही फुटेज तपासून समाजकंटकांवर पोलीस कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola