Prakash Mahajan on WAQF Board : मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्यांना मदत करणे अयोग्य
Prakash Mahajan on WAQF Board : मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्यांना मदत करणे अयोग्य.. दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्यांना मदत करणं योग्य नाही - महाजन --- वक्फ बोर्ड रद्द करण्याची मनसेची मागणी
राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला निधी दिल्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्याला मदत करणे योग्य नसल्याची टीका प्रकाश महाजन यांनी केलीय.वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलीय. दरम्यान प्रकाश महाजन यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी ..
वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विश्व हिंदू परिषदेनं सवाल उपस्थित केला होता.. यावर आता राज्य सरकार स्पष्टीकरण दिलंय., वक्फच्या बळकटीकरणासाठी २०११ पासून अनुदान देण्यात येतं असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलं....केंद्र शासनाच्या वक्फ विषयक संयुक्त संसदीय समितीने २००७ मध्ये राज्याला भेट दिली असता तत्कालीन राज्य शासनाने वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याबाबत आश्वासन दिलं.. त्यानंतर २०११ पासून योजना सुरू केल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.