
महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर, प्रकाश जावडेकरांचा दावा
Continues below advertisement
ज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर लसीकरण हा पर्याय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच लसीचे जास्तीचे डोस राज्यात पुरवले जावे या मागणीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली. मात्र राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी 56 टक्के डोस अद्यापही पडून असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement