Vanchit bahujan Aghadi Protest | मंदिरं दर्शनासाठी खुली करा, 'वंचित'चं आज पंढरपुरात आदोलन

मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज पंढरपुरात आंदोलन करणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. या आंदोलनला 200 पेक्षा जास्त संघटनाचा पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola