Prakash Ambedkar : भाजपकडून ओबीसी पूर्ण तुटल्याची स्थिती, त्यामुळे फडणवीसांकडून सारवासारव
मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील करारामुळे भाजपचा आणि कोणतीही भूमिका न घेतलेल्या मराठा पुढाऱ्यांचा बळी गेलाय, त्यामुळे आता जरांगे आणि एकनाथ शिंदे असे दोनच मराठा नेते राहिले आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसंच ओबीसी भाजपकडून पूर्णपणे तुटल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सारवासारव करत आहेत, असंही ते म्हणाले.