Serum Institute fire | सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीमागे घातपात आहे का? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
Continues below advertisement
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही लागली की, लावण्यात आली? याचा शोध राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधी या संस्थेत कधी मोठ्या आगीची घटना घडली नाही. मग लस आल्यानंतरच या संस्थेत आग कशी लागते? यावर संशयाचं वातावरण असल्याचं आंबेडकर म्हणालेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या आगीच्या घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Continues below advertisement
Tags :
Serum Fire News. Serum Institute Prakash Ambedkar Serum Institute Fire In Pune Pune Serum Institute Fire Serum Institute Fire Serum Institute Fire News