Prakash Ambedkar : ...तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल - प्रकाश आंबेडकर

Continues below advertisement

Prakash Ambedkar : ...तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल - प्रकाश आंबेडकर 

माझे संजय राऊत यांना आवाहन आहे की, ओबीसीचे राजकीय आरक्षण तुम्ही संपवले की नाही ते सांगा ? क्रिमीलेयरचा निर्णय लागू झाल्यावर एससी, एसटी यातून बाद होणार की नाही ते सांगा ? बाळासाहेब जे सांगत आहेत त्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू नका. जनतेला तुमचे खरे चेहरे आता दिसू लागल्याचे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  मोकळे यांनी म्हटले आहे की, बाळासाहेबांनी सकाळी रुग्णालयातून आयसीयूमध्ये असताना जनतेसाठी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मतदारांना आणि जनतेला आवाहन केले आहे की, जर ओबीसी, एससी, एसटी यांचे आरक्षण वाचवायचे असेल तर या निवडणुकीत योग्य भूमिका घ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे रहा.  त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, बाळासाहेबांचे हे विधान सत्यावर आधारित नाही. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. महाराष्ट्र आम्ही सांभाळू. महाराष्ट्र सांभाळण्याच्या गप्पा मारणाऱ्या संजय राऊत यांना सांगायचं आहे की, बाळासाहेबांची विधाने ही तथ्यावर आणि सत्यावर आधारित आहेत. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षानंतरच्या सत्तेनंतर महायुती सत्तेत आली. या दोघांच्या कार्यकाळात ओबीसीचे राजकीय आरक्षण यांनी वाचवले नाही,असं सिद्धार्थ मोकळे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram