Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला, पोलीस खात्याला खुलं आव्हान
सांगलीत वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटोला हार घालून सभेला सुरुवात केली. टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला तर बघा असे काही जणांचे आदेश होते. पण पोलिस खात्याला आव्हान आहे पाच वर्षानंतर निवडणूका येतात आणि सरकार बदलते.आतापर्यंत सत्तेत सहभागी होण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही.पण आता सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी दिलंय.. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.