Prakash Ambedkar on Shiv Sena Vanchit Alliance :महापालिका निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याचा निर्णय झालाय
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती पाहायला मिळू शकते. आगामी महापालिका निवडणुकांसाठी वंचितची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली ठाकरे गटासोबत चर्चा झाली असून, या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णयही झाला असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीतल्या ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याची तयारी असल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचा आम्हाला सोबत घेण्यासाठी खुला विरोध आहे, तर काँग्रेसचा छुपा विरोध आहे, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता योग्य तो निर्णय ठाकरेंनाच घ्यावा लागेल, असंही आंबेडकर यांनी सांगितलं. ठाकरे गटासोबत चर्चा होण्याआधी मुंबई महापालिकेच्या ८३ जागा लढवण्याची वंचितची तयारी होती. पण आता ठाकरे गट आम्हाला सोडेल, तितक्याच जागा लढवण्याची तयारी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.