Prakash Ambedkar On OBC Reservation: ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे

Prakash Ambedkar On OBC Reservation: ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वाशिमच्या पोहरादेवी येथे खळबळ जनक वक्तव्य केलं असून या निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं त्यांनी ओबीसींना आवाहन केलय. विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटील की जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं वक्तव्य आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे आलेले असताना प्रकाश आंबेडकर यांनी केले.  नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.  या निवडणुकीत खूनगाठ बांधा मी ओबीसीलाच मतदान करणार..  त्यामध्ये  कुणबी मराठाला मतदान करणार नाही..   कारण इथला कुणबी मराठा डबल भूमिका करतो   आपल्या मध्ये बसला की स्वतःला ओबीसी म्हणवतो, आणि पाटलामध्ये बसला की मराठा म्हणतो...  विधानसभेत ठरावाच्या वेळी त्याच्यातली पाटीलकी जागृत झाली मग काय राहील आपलं.  तो आपल्या बाजूने मतदान करण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान करेल...  ओबीसी मधील इतर जातीच्या उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola