Prakash Ambedkar | वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची एमआयएमला पुन्हा एकदा साद?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी परत एकदा 'एमआयएम'चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींना मैत्रीसाठी अप्रत्यक्षपणे साद घातली आहे. बिहार निवडणुकीसाठी ओवेसी सोबत आल्यास निवडणुकीचं चित्रं बदलू शकते, असा आंबेडकरांना विश्वास आहे. आज आंबेडकरांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. बिहार निवडणुकीत दलित, आदिवासी आणि मुस्लीम एकत्र आले तर एनडीएचा पाडाव शक्य असल्याचे आंबेडकर म्हणाले. बिहार निवडणुकीनिमित्ताने देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आंबेडकर म्हणाले.