Zero Hour : शनिवारवाड्यात नमाज.. राजकीय आंदोलनाचा 'अंदाज'! निवडणुकीच्या खेळीत धर्माचं कार्ड

Continues below advertisement
निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असून, नेतेमंडळींकडून वादग्रस्त विधानांची मालिका सुरू आहे. पुण्यात Shaniwar Wada मध्ये काही महिलांनी नमाज पठण केल्याच्या व्हिडिओनंतर भाजप खासदार Medha Kulkarni यांनी तिथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. तर दुसरीकडे, 'मुलगी ऐकत नसेल, अन्यधर्मियांकडे जात असेल तर तिचे पाय तोडायला मागेपुढे पाहू नका', असा खळबळजनक सल्ला भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी दिला आहे. बिहारमध्ये (Bihar) केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी, 'आम्हाला नमक हरामांची मतं नको', असे म्हणत मुस्लिमांवर निशाणा साधला. याशिवाय भाजप खासदार अशोक यादव यांनी मोदीविरोधकांना सरकारी धान्य न घेण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशात, अखिलेश यादव यांनी अयोध्येतील दीपोत्सवावरील खर्चावरून प्रश्न उपस्थित करत त्याची तुलना ख्रिसमसशी (Christmas) केली आहे. या सर्व घटनांमुळे निवडणुकीपूर्वी जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola