Praful Patel on Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या दाव्यांबद्दल पटेलांचं उत्तर, म्हणाले होय मी...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPraful Patel on Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या दाव्यांबद्दल पटेलांचं उत्तर, म्हणाले होय मी...
Praful Patel on Sharad Pawar : शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2004 च्या विधानसभा निवडणुकीवरुन दावे-प्रतिदावे सुरुच आहेत. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा येऊन देखील काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रिपद कशामुळे देण्यात आले? असे सवाल अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना विचारताना दिसत आहेत. दोन्ही गटांच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. 2004 पासून भाजपशी युती करण्यासाठी शरद पवारांकडे आग्रह धरत होतो, असे पटेल यांनी म्हटलंय. त्यामुळे आता पुन्हा शरद पवारांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.