Hingoli मध्ये दाखल होताच प्रज्ञा सातव यांचे जंगी स्वागत,बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंगोलीत जल्लोष

हिंगोली : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यात दाखल होताच प्रज्ञा सातव यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. कळमनुरी  तालुक्यातील हिवरा फाटा येथून स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. एकेकाळी हिंगोली जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला असल्या सारखी स्थिती होती. नंतर मध्यंतरी ही स्थिती बिकट झाली होती. त्या नंतर राजीव सातव यांना राज्यसभेवर घेऊन पक्षाने काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला. मात्र राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेससाठी मोठी हानी ठरली. माञ आता प्रज्ञा सातव यांच्या विधान परिषदेवर झालेल्या निवडीमुळे काँग्रेसचे व सातव समर्थकांचे बळकट होण्यास मदत होणार आहे. झालेल्या निवडीबद्दल प्रज्ञा सातव यांनी पक्षश्रेष्ठींचे जनतेचे आभार मानले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola