जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशी प्रकरणी जल व्यवस्थापन तज्ञ प्रदिप पुरंदरेंची प्रतिक्रीया

Continues below advertisement

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांशी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच कॅगनेही यावर ठपका ठेवला होता. याच अनुषंगाने ठाकरे सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केलाय. या अहवालानुसार जवळपास एक हजार कामांची खुली चौकशी केली जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या एक हजार कामांची चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यापैकी तब्बल 900 कामांची अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी होणार आहे, तर उर्वरित 100 कामांची विभागीय चौकशी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर जल व्यवस्थापन तज्ञ प्रदिप पुरंदरेंनी यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram