Kishori Pednekar कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तक वाटपाचा वाद,पेडणेकरांचा आढावा
Continues below advertisement
मुंबईतील एका प्रतिष्ठित रुग्णालयात एका कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेळी प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक भेट देण्यावरून वाद निर्माण झाला. कस्तुरबा रुग्णालयातील राजेंद्र कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक भेट म्हणून दिले. काही महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक घेण्यास नकार देऊन ते फेकल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या कामगार संघटनेने प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देण्यात गैर काय, असा प्रश्न उपस्थित केला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी कस्तुरबा रुग्णालयाला भेट दिली आणि घडलेला प्रकार जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी राजेंद्र कदम यांच्या पुस्तक वाटण्याच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. "एकोणीसशे पंचवीस साली लिहिलेलं पुस्तक आत्ता वाटून काय साध्य करायचं होतं? यामागे काय राजकारण आहे?" असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. याप्रकरणी राजेंद्र कदम यांनी तक्रार दाखल केली असून, महिला कर्मचाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement