Prabhakar Sail यांच्या मृत्यूवरून राजकारण? काय आहे प्रकरण?
ज्यांच्या वक्तव्यामुळं क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला कलाटणी मिळाली.... ज्यांच्या वक्तव्याचा आधार घेत मंत्री नवाब मलिकांनी एनसीबी आणि एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडेंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं, ते पंच प्रभाकर साईल यांचा काल मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.. आणि आता प्रभाकर साईल यांच्या मृत्यूवरुन पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरु झाली आहे.. प्रभाकर साईल यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला ?की त्यांचा घात करण्यात आला याची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. तर दुसरीकडे भाजपनं देखील प्रभाकर साईल यांच्या मृत्यूवर संशय उपस्थित करत काही सवाल उपस्थित केले आहेत..प्रभाकर साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आला नाही ना असा प्रश्न भाजप आमदार अतुल भातखळकरांनी ट्विट केला आहे.