Powai Hostage Crisis: 'A Thursday' सारखं अपहरण, अभिनेत्री Ruchita Jadhav चा धक्कादायक खुलासा
Continues below advertisement
मुंबईच्या पवई (Powai) येथील अपहरण (Kidnapping) आणि ओलीस नाट्य प्रकरणातील आरोपी रोहित आर्य (Rohit Arya) याने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. 'त्यांनी जी स्टोरी मला सांगितली होती, ती स्टोरी त्यांनी प्रत्यक्षात केली,' असा खुलासा अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav) यांनी केला आहे. रोहित आर्य याने चित्रपट निर्माता असल्याचे भासवून अभिनेत्री रुचिता जाधव, गिरीश ओक (Girish Oak) आणि उर्मिला कानिटकर कोठारे (Urmila Kanitkar Kothare) यांच्याशी संपर्क साधला होता. 'अ थर्सडे' (A Thursday) या चित्रपटातून प्रेरणा घेऊन त्याने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे, ज्यामध्ये १७ मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. आर्यने 'अ वेन्सडे' (A Wednesday) चित्रपटाचा संदर्भ देत एका सामान्य माणसाचा लढा लोकांसमोर मांडत असल्याचे सांगितले होते, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement