Powai Encounter: '...हा खूनच आहे', वकील नितीन सातपुतेंचा आरोप, Rohit Arya एन्काऊंटर बनावट?

Continues below advertisement
मुंबईच्या पवईमधील (Powai) ओलिस नाट्य आणि रोहित आर्य (Rohit Arya) एन्काऊंटरमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वाद पेटला असून, एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'हा एन्काऊंटर टाळता आला असता, हा खून आहे', असा गंभीर आरोप वकील नितीन सातपुते यांनी केला आहे. रोहित आर्य याने सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या योजनेचे काम केले होते, पण त्याचे पैसे थकल्याचा आरोप त्याने केला होता. यावर मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली असून, 'आर्याच्या कंपनीने एका वेबसाईटद्वारे थेट मुलांकडून पैसे गोळा केल्यामुळे आणि आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने त्याचे पेमेंट थांबले होते', असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारने निधी थकवल्याने रोहितने हे पाऊल उचलल्याचा दावा विरोधक आणि आर्यच्या कुटुंबीयांनी केला आहे, तर सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची चौकशी आता मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola