रत्नागिरीच्या लांजा, तळेकांटे रस्त्यावर 90 किलोमीटरपर्यंत खड्डे, खड्ड्यांमुळे वाहन चालकांची अडचण
Continues below advertisement
मुंबई-गोवा मार्गावरून प्रवास करताना खड्डयांचा प्रवास होत आहे. मुंबई-गोवा मार्गावर सध्या खड्डेच खड्डे असं चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते तळेकांटे तसेच लांजा या 90 किमी मार्गावर सध्या खड्डेच खड्डे आहेत. जवळपास 1400 कोटींचं हे काम असून एमईपी कंपनीकडून दोन वर्षानंतर केवळ 15 टक्केच काम झालं आहे. कोकणातील पावसाळा पाहता यंदा सुरूवातीलाच दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना होत आहेत.
Continues below advertisement