Post Office Scam: '...एकही पैसा नाही', Post Master सिंधुबाई बाळबुधेने नागपूरच्या दिग्रसमध्‍ये गावकरी लुटले?

Continues below advertisement
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामधल्या दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर सिंधू बाळबुधे यांनी सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप होत आहे. 'माझे तीन लाख फिक्स होते... पासबुकात तो एकही पैसा नाही,' अशी व्यथा एका पीडित गावकऱ्याने मांडली. या प्रकरणात, महिला पोस्ट मास्टरवर पैसे काढण्याच्या स्लीपवर सह्या घेऊन, आरडी आणि एफडी खात्यांमध्ये पैसे जमा न करता ते स्वतःकडे ठेवल्याचा आरोप आहे. अनेक गावकऱ्यांना बनावट पासबुक देऊन त्यांच्या खोट्या नोंदी केल्या गेल्या. वंडली, येरळा, धोटे, हरमखोरी यांसारख्या गावांमधील शेकडो कुटुंबांनी कष्टाने कमावलेले पैसे मोठ्या विश्वासाने पोस्टात जमा केले होते, पण त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डाक विभागाचे उपविभाग निरीक्षक बालाजी पांडुरंग शेटवाड यांनी तक्रार दाखल केली असून, पोलीस तपास करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola