कोरोनातून बरे झालेल्यांना Physiotherapy चा फायदा! पोस्ट कोविड रुग्णांनी कोणते व्यायाम करावे?
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनावर मात केल्यानंतर या काळात आपल्याला फिजिओथेरपीसारख्या उपचार पद्यतीने कशा प्रकारे मदत झाली याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला होता. यावेळी त्यांनी काही व्यायाम प्रकार देखील करून दाखवले होते. यानंतर सोशल मीडियात काही असे देखील व्हिडिओ व्हायरल झाले होते ज्यामध्ये चुकीच्या पद्यतीने उपचार केले जात असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता एबीपी माझाने कोरोना काळात कशा पद्यतीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, पोस्ट कोव्हिडं मध्ये कोणते व्यायाम करणं गरजेचं आहे याबाबत संवाद साधला आहे तज्ज्ञ फिजिओथेरपीस्ट डॉ. सुधीर काळे यांच्याशी!